हणबरवाडी गांव डोंगर वस्तीच्याखाली कात्यायनी डोंगराच्या परिसरात वसलेले गांव असुन गावात हण्ाबर समाज वस्ती असलेने पूर्वी गावांस हण्ाबरवाडी हे नाव पडले. गावांत जागृत ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिर असुन, मरगाई मंदिर, हनुमान मंदिर व विठ्ठल मंदिर इत्यादी मंदिरे आहेत. गावाला वारकरी सांप्रदायाची पंरपरा आहे. त्याच्या माध्यमातुन गावांत धर्मिक व समाज – उपगयोगी उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. गावातील तरूण्ा मुले, मर्दानी खेळ, कुस्ती इ. हलगी वादन मध्ये उत्कृष्ठ कामगिरी करत आहेत. गावांतील मुख्य व्यवसाय शेती असुन गावांत वाहनचालकांकरिता गांव परिसरात प्रसिध्द आहे. गावात एक पाझर तलाव आहे. दुग्ध्ा व्यवसायाकडे जोडधंदा म्हणून प्रामुख्याने पाहिले जाते. संपुर्ण्ा गांव कोरडवाहू पट्टयात येते. गावामध्ये भात, ज्वारी, भुईमुग इ. पिके प्रामुख्याने घेतली जातात.